Sunday, June 26, 2011

इडली (Idli)

साहित्य:
  • २ वाटया तांदूळ,
  • १/२ वाटी उडीद डाळ
  • १/४ चमचे मेथ्याचे दाणे
  • मुठभर पोहे / तयार शिजवलेला भात (optional)

कृती :
तांदूळ आणि उडीद डाळ वेग-वेगळी भिजत घालावी.उडीद डाळीबरोबरच मेथ्याचे दाणे भिजवावेत. साधारण ६ ते ८ तास भिजल्यावर mixer मधून पहिल्यांदा तांदूळ मग उडीद डाळ आणि मग दोन्ही एकत्र बारीक करून घ्यावे. तांदूळ बारीक होण्यासाठी  जरा जास्त वेळ लागेल.

वरील मिश्रण १० ते १२ तास भांड्यात झाकून ठेवावे.
इडली करताना त्यात चवीप्रमाणे मीठ आणि २ चमचे  कढवून गार केलेले तेल घालावे. मग  इडली पात्राला तेल लावून त्यावर मिश्रण घालावे म्हणजे इडल्या खाली चिकटणार नाहीत.
१५ ते २० वाफवल्यानंतर बाहेर काढून सांबार आणि नारळाच्या चटणी बरोबर खायला द्याव्या. 

टीप:
१. उडीद आणि तांदूळ जेवढे जास्त वेळ mixer मध्ये फिरवाल तेवढी इडली मऊ होते.
२. उडीद डाळ आणि तांदूळ mixi मध्ये फिरवायच्या आधी तासभर मुठभर पोहे भिजवून तेही वरील मिश्राणाबरोबर बारीक करून घ्यावेत. पोह्याच्या ऐवजी तयार भात घातला तरी चालेल. त्यामुळे इडल्या हलक्या होतात. 


No comments:

Post a Comment